Vocational Course for Students 10 Top Gift

Date:

Share post:

Vocational Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा ‘हे’ वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी.

Vocational Course For Students: आजच्या काळात तरुण वर्गातील उमेदवारांना पटकन अभ्यास पूर्ण करून नोकरी मिळवायची आहे. यासाठी अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत जे सहज नोकरी मिळण्यास मदत करतात.

आजच्या लेखात आम्ही अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत ज्यातून दहावी, बारावीनंतर चांगले पैसे मिळू शकतात.

Vocational Course for Students 10 Top Gift

परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा ‘हे’ वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी,

Vocational Course For Students: सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा संपून विद्यार्थी सुट्टी एन्जॉय करतायत. शाळांसोबत महाविद्यालयांच्या परीक्षा देखील अंतिम टप्प्यात आहेत. यानंतर सर्वांना मे महिन्याची सुट्टी सुरु होईल आणि जून मध्यांतरात शाळा-कॉलेज पुन्हा सुरु होतील.

हे सुट्टीचे दिवस कसे निघून जातील हे विद्यार्थी आणि पालकांनाही कळत नाही. दरम्यान या सुट्टीचा फायदा करुन अनेक वोकेशनल कोर्स विद्यार्थ्यांना करता येतील. यानंतर तुम्ही जेव्हा शाळा-कॉलेजमध्ये परताल तेव्हा तुमच्याकडे इतरांपेक्षा वेगळे कौशल्य असेल.

सर्वप्रथम आपण व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय आणि तो का करावा? याबद्दल माहिती घेऊया. जो अभ्यासक्रम केल्यावर थेट नोकरी मिळते, अशांना व्यावसायिक म्हणतात. त्याला जॉब ओरिएंटेड अर्थात जॉब ओरिएंटेड कोर्सही म्हणता येईल.

हे अभ्यासक्रम दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुरू करता येतात. या अभ्यासक्रमांचा कालावधी १ ते २ वर्षांचा असतो. आणि यानंतर तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते.

इंटिरियर डिझायनिंग

इंटिरियर डिझायनिंग हा एक कमी कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही हा कोर्स कधीही करू शकता. हा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी स्वत:चा व्यवसायही सुरू करू शकतात. यासोबतच विद्यार्थ्यांना नोकरीचा पर्यायही उपलब्ध होतात. या क्षेत्रात खूप चांगला पैसा कमाविण्याची संधी आहे.

अ‍ॅनिमेशन डिझायनिंग

अ‍ॅनिमेशन डिझायनिंगचा कोर्स दहावी नंतरही करता येतो. गेमिंग आणि अॅनिमेशनची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करणे योग्य ठरते. या क्षेत्रात टेक्निकल लोकांना खूप मागणी आहे.

फिटनेस कोर्स

हा कोर्स करुन तुम्ही स्वतःसोबत इतरांना फिट ठेवू शकता. अनेक सेलिब्रिटींना वैयक्तिक आहारतज्ज्ञाची गरज असते. ते त्यांना भरघोस पगार देण्यासही तयार असतात.

परदेशी भाषा अभ्यासक्रम

परदेशी भाषा अभ्यासक्रम तुम्हाला देशात तसेच परदेशात नोकरीच्या संधी देतो. हा कोर्स करणाऱ्यांसाठी सरकारी पदांवरही भरती निघते.

ज्वेलरी डिझायनिंग कोर्स

ज्वेलरी डिझायनिंग कोर्स करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यासोबतच चांगले पगार असलेले खासगी नोकरही सहज उपलब्ध आहेत.

Vocational Course for Students 10 Top Gift

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 1 =
Powered by MathCaptcha

spot_img

Related articles

Krishinivesh.gov.in – Your One-Stop Portal for Smart Farming & Agricultural Investments

अब खेती और निवेश की जानकारी एक ही क्लिक पर! कृषि निवेश पोर्टल — आपका भरोसेमंद साथी, समृद्ध...

Budget: Doubled Limits & Updated MSME Classification

एमएसएमई को सशक्त बनाना: वर्ष 2025-26 के बजट में MSMEs के लिये निवेश और टर्नओवर की सीमा दोगुनी...

From Food to Food Giver: The Golden Journey of Health

अन्न से अन्नदाता तक – सेहत का सुनहरा सफर! पोषण पखवाड़ा 2025 – सेहतमंद बचपन की मजबूत नींव।जहाँ...

MSP Direct Pay: Faster Transparent Payments Empowering Farmers

MSP का नया दौर – सीधा भुगतान, सशक्त किसान! MSP पर खरीदी गई फसल का पैसा अब सीधे...