Orchard Planting Scheme

Date:

Share post:

फळबाग लागवड योजना

राज्य शासनाकडून १००% अनुदान देणाऱ्या फळबाग लागवड योजनेचा असा घ्या फायदा!

राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात (maharashtra government) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना.

(Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरु करण्यात आली.

राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची लागवड करतात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करणारे सांगली, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती. या जिल्ह्यात फळबागांचे उत्पादन मोठे घेतले जाते. दरम्यान राज्यशासनाकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात यामध्ये काही शेतकरी. (farmers) याचा फायदा घेतात तर काही शेतकरी यापासून वंचित राहतात.

राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. २०१८-१९ पासून महाराष्ट्र राज्यात (maharashtra government) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरु करण्यात आली. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

या योजनेमार्फत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळते

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती. झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana साठी राज्य सरकारने पात्रता निश्चित केल्या आहेत. अर्जदार जर पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करत असेल तरच तो फळबाग लागवड योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच शेतात बसवणे बसविणे अनिवार्य आहे. Orchard Planting Scheme.

सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व मुले).

लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्‍यांना कोणताही लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्याचा स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे.

संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.

७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.

परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.

इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

फळबाग लागवड योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे

७/१२ व 8-अ उतारा

हमीपत्र

संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र

जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमातीशेतकऱ्यांसाठी) Orchard Planting Scheme

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

तुम्ही जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर  या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

सर्वात आधी तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.

वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाइन अॅप्लिकेशन या लिंक वर क्लिक करावे लागेल,

यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा. उदा. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.

ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. Orchard Planting Scheme

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

Potato Farming in Hindi | आलू की खेती उन्नत किस्में बना रही है किसान

Potato Farming in Hindi | आलू की खेती उन्नत किस्में बना रही है किसानPotato Farming in Hindi: विश्व...

The Impact of Planters and Seeders on Your Garden

The Impact of Planters and Seeders on Your Garden. Gardening is more than just a hobby; it's a...

Powder Duster Petrol Sprayer Price

Understanding the Powder Duster Petrol Sprayer: A Comprehensive GuidePowder Duster Petrol Sprayer Price The powder duster petrol sprayer...

Electric Powder Duster Sprayer

Introduction to Electric Powder Duster Sprayer Electric Powder Duster Sprayer In modern pest control and agricultural practices, electric powder...