Cow Gotha Subsidy Scheme

Date:

Share post:

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक. तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी.

योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Gai Gotha Anudan Yojana आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे. रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर  जनावरांचे.

संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते.

त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.

विशेष सूचना: आम्ही गाय गोठा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा. जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील जे गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील.

तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण गाय गोठा अनुदान योजना काय आहे. Gai Gotha Anudan Yojana उद्दिष्ट काय आहे, Gai Gotha Anudan Yojana Maharashtra वैशिष्ट्य काय आहेत.

Maharashtra Gai Gotha Anudan Yojana फायदे काय आहेत, Gai Gotha Yojana पात्रता काय आहे, Gai Gotha Anudan Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत.

Gai Gotha Anudan Yojana अर्ज करायची पद्धत, गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नावगाय गोठा अनुदान योजना
योजनेची सुरुवात३ फेब्रुवारी २०२१
विभागकृषी विभाग
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीमहाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी
लाभजनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Maharashtra Gai Gotha Anudan Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
  • नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता. भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra Features

  • महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  • गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा साठा न करता आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते. जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन. पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा.
  • करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येईल.तसेच गव्हाणी बांधून गुरांना त्याचा चारा खाण्यासाठी उपयोग होईल.
    • या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
    • या योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाईल.
    • ६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
    • १२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
    • गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असेल
      गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
      जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.

गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज कसा भरावा

Gai Gotha Yojana 2022 Online Apply Cow Gotha Subsidy Scheme.

  • या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची  खूण करावी.
  • त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
  • अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
  • अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
  • अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
  • लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
  • लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
  • तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
  • त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

PM Modi Dhan Dhanya Krishi Yojana

PM Modi Dhan Dhanya Krishi Yojana Addressing a post-budget webinar, PM Narendra Modi said the scheme will. Focus on...

Income Tax Bill 2025: Agricultural income, farmland has been tweaked

Income Tax Bill 2025: Agricultural income, farmland has been tweakedSection 10 of the Income Tax Act, which previously...

No Non-Agriculture status required for industrial use of land: Revenue minister

The BJP leader and minister said that the decision to amend the Maharashtra Land Revenue Code has been...

Kisan Credit Card (KCC) Loan Limit Raised – From Rs.3 lakh to Rs.5 lakh for farmers

Kisan Credit Card (KCC) Loan Limit Raised – From Rs.3 lakh to Rs.5 lakh for farmers